Friday, November 13, 2009

लग्न





लग्न हा एक जुगार आहे असे म्हणतात. या विषयावर बऱ्याच लोकांचे वेगवेगळे विचार, वेगवेगळे मते आहेत. आपणाला कश्याप्रकाराचा जोडीदार हवा हे प्रत्येकाने स्वत्ताच ठरवायचे असते. शेवटी हा प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न असतो.
पण जेंव्हा ही वेळ येते तेंव्हा असे आढळून आले आहे कि बऱ्याचजणांना नेमका काय निर्णय घ्यावा हेच समाजात नाही. कित्तेक मुले आणि मुली आहेत कि त्यांना लग्न केंव्हा करायचे व आपण पुढील वक्तीकडून काय अपेक्ष्या ठेवल्या पाहिजेत हेच नेमके माहित नसते.
प्रत्येकालाच लग्न करायची हौस तर भारी असते पण बऱ्याच जणांना ते पेलण्याची लायकीच नसते. लग्ना विषयी अनेक लोकांच्या विविध संकल्पना, विविध विचार, विविध अपेक्ष्या असतात. लग्न हे नाव आल्याबरोबर अनेक प्रश्न सुद्धा निर्माण होतात. पहिलाच प्रश्न असतो तो मुलगा किंव्हा मुलगी कशी असावी. सुंदर मुलगी तर प्रत्येक तरुणाला हवी असते मग तो स्वतः कितीही  नकटे किंवा काळा असो. बरे सुंदरता तर ठिक आहे त्याच सोबत हवे असतात गुण. आत्ता प्रश्न आला गुणांचा. आत्ता ते कसे पहायचे? तसे पाहायला गेल्यास आत्ताच्या युगात ती हि मिळणे जास्त काही अवघड नाही.
बरे हे सर्व ठिक आहे. या सर्व गोष्टीनंतर खरा खेळ चालू होतो. तो म्हणजे पत्रिका पाहण्याची. पत्रिका म्हटली कि आली कुंडली, रास,नाड. एक नाड  नसावी, किती गुण जुळतात, तो गण का काय ते पण असतं, त्यात म्हणे राक्षस, देव, मनुष्य, वानर असे प्रकार असतात. राक्षस आणि देव गण, राक्षस आणि मनुष्य गण जमत नसते, का तर त्यांच्यात नेहमी भांडण होतात. तुम्ही खरच मानता का हो हे सगळे? 
तसे पहायाले गेले तर कितेक  पत्रिका ह्या अंदाजेच तयार केलेल्या असतात. माझ्या मते तर समोरचा व्यक्ती कसा आहे  ते पहा, त्याच स्वभाव, शिक्षण, आवडी निवडी काय आहेत ते पाहणे जरुरीचे आहे. तो कोणत्या परिस्तिथीतून पुढे गेला आहे, स्वतःच्या हिमतीवर  पुढे गेला आहे का, किंव्हा स्वतःच्या कर्तुत्वावर उभा आहे ते पहा. तो खरच धाडसी , हिमती आहे का ते पहा. मुलाकडे किती मालमत्ता, किती  जमीनजुमला आहे हे पाहण्याच्या ऐवजी त्याला ती सांभाळायची तर अक्कल आहे का नाही ते पहा. बरेच माणसे मुलाच्या घराची संपत्ती पाहूनच लग्न ठरवतात.
मुलगी पाहताना सुद्धा आपल्याला शोभेल अशीच मुलगी मुल्लांनी पहावी असे मला तरी वाटते. नाहीतर भरपूर पैसा मिळतोय म्हणून कसल्याही मुलीशी लग्न करणारी हि मुले आहेत. माझ्या मते तर पहिली अट तर मुलगी हि शिकलेली असावी. कारण शिक्षण हि एक खूप महत्वाची गरज आहे. जर दोघेही शिकलेले असतील तर कमीत कमी दोघांमध्ये वैचारिक मतभेद कमी होतील असे मला वाटते. मुलगी हि घरच्यांचा वडिलधाऱ्यांचा मान ठेवणारीच असावी. पिझ्झा बर्गर यापेक्षा सुद्धा घराच्या जेवणाला महत्व देणारी असावी. सर्वांशी मिळून मिसळून राहणारी असावी.
या पेक्षाही महत्वाचे म्हणजे दोघांनीही आपली वैद्यकीय चाचणी करून घ्यावी. त्यामुळे मुलामध्ये किंवा मुलीमध्ये काही दोष आहेत का नाहीत ते कळून येईल. काही टाळण्याच्या गोष्टी असतील तर त्या टाळता येतील. सोबतच दोघांनापण लग्ना आगोदर मोकळेपणाने बोलू द्यावे. दोघांनी पण आपापले विचार एकमेकां समोर स्पष्ट बोलावेत. आपणाला भविष्यात काय करायचे आहे  किंवा नाही ते प्रथम स्पष्ट करून घ्यावे व नंतरच लग्न करावे.
ह्या तर झाल्या लग्नाआधी पाहण्याच्या गोष्टी, पण खऱ्या गोष्टी तर लग्नानंतरच असतात. माझा अर्थ फक्त तो नाही  तर, दोघांनी पण एकमेकांशी कसे वागावे, कसे राहावे. कारण लग्नानंतर बत्याच गोष्टी या चुकीची माहिती किंव्हा गैरसमजामुळे होतात. कामाचे हि पाहता ते घराच्या वातावरणावर अवलंबून आहे. जर मुलगी  नौकरी करत नसेल तर थोडे ठीक आहे , कारण त्या वेळी बहुतेक काम मुलगीच करते, पण अश्यावेळी थोडी फार कामे मुलाने केली तर हरकत नाही असे मला वाटते. उलट अश्या वेळी मुलींना खूप छान पण वाटते. तुम्ही काम केले नाही तरी चालेल पण एकदा म्हणून पहा कि "मी काम करतो", बघा ती तुम्हाला काम तर करूच देणार नाही, तर आहे ते काम पण ती मनापासून करेल. आणि बायको जर नौकरी करणारी असेल तर त्यावेळी मात्र तुम्हालाही मदत करणे गरजेचे आहे. आणि मुलींनी पण नौकरी करत असताना सुद्धा आपल्या घराचे घरपण जात नाही ना ते पाहावे. आणि शक्य असेल  तेवढे घरीच वेळ काढावा, घरामध्ये स्वतः बनूनच  जेवण करावे, यामुळे घराचे घरपण कायम राहते.

3 comments:

प्रकाश बा. पिंपळे said...

खरच खूप चं लिहिलंय प्रसाद ने. आणि अगदी प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला [म्हातारे आणि इतर वयोगटांना हि ] पटेल असच आहे! तुला अशीच छान बायको मिळो हीच तुझ्या होणार्या सासर्याकडे प्रार्थना!

Shubhada Nandarshi said...

एकदम बरोबर लिहीले आहेस. I agree with you... पण पत्रिका, कुंडली... ह्या गोष्टी आपल्या समाजात खुप खोलवर रुजलेल्या आहेत, सो ते काढून टाकणे खुप कठीण आहे & काही प्रमाणात नाड़ी वगैरे पहाणे योग्य असते...medical science point of view ने. ANYWAYS... खुप छान लिहिले आहेस . मांडणी पण चांगली आहे. keep on writing...

आलोक said...

" ... आणि शक्य असेल तेवढे घरीच वेळ काढावा ..." I hope हे दोघांसाठी आहे, फक्त मुलींसाठी नाही. Good thoughts in there. Keep writing. All the best!