Tuesday, May 18, 2010

ट्राफिक जाम (Traffic Jam)

मुंबई म्हटले कि ट्राफिक हि आलीच. आत्ता ती सकाळ असो, अथवा दुपार असो किंव्हा रात्र. १४ मे २०१०, आमच्या product launch चा दिवस. आम्ही सर्व हॉटेल रमाडा येथे जमलो होतो. संध्याकाळचे ६ वाजले आणि आमचे product launch झाले. नंतर सर्वांनी जेवण करून वापस येण्याची तयारी करत होतो. जवळपास रात्रीचे ९.३० झाले होते तेंव्हा आमची बस जुहू पासून खारघर ला येण्यासाठी निघाली. जुहू ते खारघर जाण्यासाठी जवळपास २ तास लागतात. या हिशोबाने आंम्ही वापस निघालो. बस मध्ये खारघरचा सर्व staff बसला होता. मी व माझ्या group मधील सर्वच staff भरपूर खुश होतो. कारण आमचे product launch झाले होते. बस मध्ये आम्ही सर्व जण गाण्याच्या भेंड्या खेळत येत होतो. सायन कधी आले ते कळले सुद्धा नाही.
त्यानंतर हळू हळू वाशी पर्यंत आलो. वाशी ते सानपाडा या दरम्यान बरेचसे ट्राफिक होते. काही वेळेनंतर तर बस एकदम थांबलीच. काही वेळ तेथेच गेला. आम्हाला काही कळेना कि ट्राफिक कशामुळे झाली आहे ते. तसे बराच वेळ बसमद्धे बसून कंटाळा आला होता, म्हणून वाटले जरा पाहावे तरी का झालाय ते. मला तर वाटले अपघाताच झाला असेल. थोडा पुढे जाऊन पाहतो तर काय, काही अंतरावर चौरस्ता होता व एक मोठ्ठा container या चौरास्त्यावारती आडवा झाला होता. आडवा म्हणजे पालटी वगैरे झाला नव्हता तर चालकाने तो आडवा घुसवला होता. त्याच्या आडवी एक बस व बसच्या आडवे कार, जीप आणि रिक्षावाले. आणि अश्याप्रकारे सर्व वाहने जाम झाली होती. रात्रीचे जवळपास १२ वाजले होते, आगोदरच खूप वैताग आला होता आणि त्यात हा ट्राफिक जाम.
आत्ता काय करायचे असा विचार मनामध्ये करत होतो. हे ट्राफिक काही लवकर क्लेअर होणार नाही असा अंदाज वाटत होता. मग वाटले आपणालाच काहीतरी करावे लागेल. मी थोडा सर्व वाहनांमधून इकडे तिकडे जाऊन पहिले. पाई चालायला सुद्धा जागा नव्हती. आगोदर त्या मोठ्ठ्या container ला बाजूला काढणे गरजेचे होते. कसेतरी करून बस सामोरील लहान सहान वाहनांना आगोदर थोडेसे बाजूला केले. नंतर बस ला बाजूला करत होतो तोच बस पाठीमागील वाहने पण पुढे येऊ लागली. मी त्यांना तेथेच थांबायला सांगितले व त्यांनी ऐकले पण. मग मी त्या container ला आगोदर बाजूला केले. तो बाजूला निघत असतानाच बाकीचे वाहने घुसवा घुसावी करू लागले. त्यातून हे रिक्ष्यावले तर तुम्हाला माहीतच आहेत ना. नंतर तेथील लहान सहान वाहनांना रस्ता देत देत थोडेसे ट्राफिक कमी केले. आणि काही वेळातच सर्व ट्राफिक क्लेअर केले. त्यावेळी सर्व जण माझे कसे काय ऐकत होते ते मला माहित नाही पण ते पाहून मला खूप आनंद झाला. बहुतेक मी घातलेला formal dress पाहुन सर्वांना असे तर वाटले नसेल ना कि मी एक चांगला gentleman आहे. पण ट्राफिक क्लेअर करता करता १० ते १५ मिनिटे गेली. पण जो काही अनुभव मला आला तो माझ्यासाठी अविस्मरणीय होता. मला वाटले कि आपण ट्राफिक हवालदाराची पण कामगिरी पार पाडू शकतो.