प्रेम ह्या शब्दातच इतका गोडवा आहे ना, कि प्रेमाचा विषय जरी काढला तरी मन प्रफ्फुलीत होते. प्रेमाची व्याख्या करायला गेले तर ती बहुतेक करता सुद्धा येणार नाही. प्रेम हे नगण्य असते. प्रेम हे कोणालाही, केंव्हाही आणि कोणावरही होऊ शकते. तसे पहिले तर प्रेमाचेही विविध प्रकार असतात. आईचे आपल्या बाळावर, गाईचे आपल्या वासरावर, एका बापाचे आपल्या कुटुंबावर, भावाचे बहिणीवर, चित्रकाराचे चित्रावर, लेखकाचे व वाचकाचे पुस्तकावर. आत्ता महत्वाचे राहिले ते एका मुलाचे एका मुलीवरचे प्रेम.
तसे पाहता आपणा सर्वांनाच एकदातरी प्रेम व्हावे असे वाटत असते. हि गोष्ट काहीजण सांगतात काहीजण सांगत नाहीत. एका मुलाला एखादी सुंदर मुलगी दिसली कि गुदगुल्या व्हायला लागतात, तसेच मुलींनाही एखादा चांगला मुलगा पहिला कि गालातल्या गालात हसू येते. प्रेम होण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे कॉलेज, तसे आज काल शाळांमध्ये पण प्रेम होते बरका! मुलगा असो कि मुलगी दोघंही एकमेकांचे आकर्षण हे असतेच. सगळ्यात जास्त आकर्षण हे आठवी ते कोलेज चे पहिले, दुसरे वर्ष , यामध्येच जास्त असते. मी आकर्षण हा शब्द मुद्दामच वापरला आहे, कारण या वयात प्रेम ह्या शब्दाचासुद्धा अर्थ माहित नसतो. तुमचे ते वय निघून गेले असेल तर आठवून पहा जरा कधीतरी, कोणीतरी आवडून गेलेच असते आपणाला. आणि तुम्ही त्या वयात असाल तर सध्याला ते अनुभवत सुद्धा असाल.
असे म्हणतात कि, "प्यार किया नही जाता हो जाता है" म्हणजेच प्रेम हे केले जात नाही तर होते. पण मला एक गोष्ट समजत नाही कि, प्रेम वगैरे होण्यासाठी आधी काहीतरी प्रयत्न, काहीतरी खटाटोप केला पाहिजे की नाही? प्रयत्न म्हणजे फक्त मुलीच्या पाठीमागे लागणे एवढेच नव्हे तर, कमीत कमी आधी मैत्री तर करावी लागेल. मैत्री हि प्रेमाची पहिली पायरी असते असे बहुतेक लोक म्हणतात. नाहीतर सरळ जाऊन "माझे तुझ्यावर प्रेम आहे " असे जर म्हणालात, तर गालावरती चप्पलचा प्रसाद हि मिळू शकतो. मैत्री कधी सहज होते, तर कधी एखादी व्यक्ती आवडली म्हणून तरी करावी लागते. आज काल तर मैत्री हि करायला भेटावेच लागत नाही तर chatting, orkut वरूनही मैत्री होते. आणि गप्पा गोष्टी चलू होतात. या गप्पा गोष्टींमधूनच प्रेम होते. कधीकधी तर पाहता क्षणीच प्रेम होते. कसे होते देवास ठाऊक. देवाला काय त्या दोघांनाच ठाऊक. पण खरा खेळ तर पुढे चालू होतो.आत्ता प्रेम झाले पुढे काय? पुढे चालू होतात निरंतर गप्पा, गाटीभेटी, लव शव, फिरायला जाणे. आत्ता हे सर्व करायचे म्हटले कि पैसा आणि वेळ दोन्हीही खर्च कराव्या ह्या लागणारच.
बरे ते नंतर पाहू, अगोदर याच नाण्याची दूसरी बाजु बघुयात. बऱ्याच वेळा असे आढळून आले हि, खूप मुले किंव्हा मुली याच गोंधळात असतात कि आपण समोरच्या व्यक्तीच्या खरेच प्रेमात पडलोत का नाही. आपणाला खरेच प्रेम झाले आहे का नाही ते त्यांचे त्यांनाच माहित नसते. पण जे काही चालले आहे ते खूप छान आहे आणि हे असेच चालू राहावे असी त्यांची इच्छा असते. पुढे काय करायचे, किंव्हा होईल याची त्यांना काहीच चिंता नसते. हेच सुखाचे दिवस आहेत, ते मजेत घालउया, नंतर चे नंतर पाहू.
कधी कधी दोघांपैकी एकालाच प्रेम होते. ते जेंव्हा समोरच्या व्यक्तीला समजते व ती व्यक्ती या गोष्टी साठी नकार देते, तेंव्हातरी पुढे पाऊल कसे टाकायचे ते ठरवले पाहिजे. ह्या प्रेमाला एकतर्फी प्रेम असेही म्हणू शकत नाही कारण, समोरची व्यक्तीही या कारणाला तितकीच जबाबदार असते व हे सर्व होऊन सुद्धा त्यांचे बोलायचे, भेटायचे थांबत नाही, याला आपण काय म्हणायचे. अशावेळी ज्याने नकार दिला आहे त्या व्यक्तीचीच ज्यास्त चूक वाटते. जर आपला निर्णय नको असा असेल तर पुढे जायचेच कशाला!
मराठी व भारतीय संस्कृतीनुसार प्रेमाचे रुपांतर लाग्नातच होते. बऱ्याच वेळा प्रेम असलेल्यांना जातीमुळे लग्नाला विरोध असतो. हा विरोध होणार हे आधीच माहिती असेल, तर आपण नेमके काय करायचे हा निर्णय ठाम असला पाहिजे. म्हणजे आपण कोणालाही न जुमानता लग्न करायचे की, प्रेमाच्या वगैरे फंद्यातच पडायचे नाही. कमीत कमी हा निर्णय तरी पक्का असावा.
प्रेम करणे हा कधीच गुन्हा नाही. पण ते करत असताना त्याचा काही विपरीत परिणाम तरी होणार नाही ना, एका व्यक्तीच्या प्रेमासाठी आपण अनेक व्यक्तींच्या प्रेमाची आहुती तर देत नाहीत ना ते पहा. माझेतर असे मत आहे की प्रेम हे लग्नानंतर सुद्धा करता येते. प्रेम करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला जाणून घेणे जरुरीचे असते, पण आजच्या काळात तेही शक्य आहे, कारण लग्नाआधी किंव्हा लग्न जमल्यानंतर भेटण्याची, बोलण्याची संधी आजकाल आपले आई, वडील देतातच. प्रेमाचा अर्थ आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला किती सुखात ठेवतो एवढेच नव्हे तर, त्यासाठी आपण किती त्याग करू शकतो असा ही आहे. मी तर म्हणतो जे प्रेम सर्वांनाच घेऊन पुढे जाईल, सर्वांनाच सुख देईल तेच खरे प्रेम.
आणि शेवटी ज्यांना कोणाला प्रेम झाले असेल त्यांचे जीवन आनंदात जाऊदे अशी ईश्वर चरणी प्रार्थना .........!
5 comments:
PREM MHANAJE PREM ASAT!!
TUMCHE AACHE SAME ASAT !!!
Kaay be .. mast blog wog lohayala suru kelass ... aani you are writing like an expert in topic .. prem. mumbai chi hawa lagali ki.. aaple usmanabad yewadhe sudharale.. :)
Jabardast!!!
mast mitra....... premawar PhD wager karaycha prayatn ahe ki kya....? taychi ekdam mimanasach karun takali--- "vividh prakarchi preme ani tyanchi lakshane ani parinam"! he he !
chan lihalas!
Chaan lihlas (By the Philosopher point of view)...
Pan....Prem kay aaaste te zalyashiyay kalat nahi....
As per my opinion Nobody will think of future problems, caste etc. before Love.....If so then its a compromise and not a Love, As everybody does after marriage (may be converted to Love).
will post more comment soon.....
Nice Bolg go ahead with newer verson...PREM-part 2
very nice article.....keep it up to write......bt i think...if u write this ...den definatly ....u also gone frm this phase...bt nice experience for sharing things..........
Post a Comment